Tuesday, 14 March 2017

स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी, शेतकरी आत्महत्या एकाच माळेतले तीन मणी

गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या याचे प्रमाण खूपच वाढले आहे. अगतिकतेतून निर्माण झालेली ही मानसिकता आहे. या अगतिकतेची अनेक कारणे आहेत. ग्रामीण आणि शहरी उच्चभ्रू असे वेगवेगळे स्थरही यामध्ये असले तरी याबाबत दीर्घकालीन कारणाचा शोध घेणे आवश्यक आहे.

आज स्त्रीभ्रूण हत्या हा एक चिंतेचा मुद्दा बनत चालला आहे. महाराष्ट्रात बीड जिल्हयाप्रमाणे आता मुंबईतही अशा हत्या झाल्याचे उघड होत आहे. गर्भलिंग परिक्षा आणि मग मुलगी असेल तर गर्भपात हे समीकरण होत चालले आहे. या देशात स्त्री मातेसमान मानतात स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे’ किंवा  `घरी मुलगी जन्मली’ की `घरी लक्ष्मी आली’ इत्यादी विचार व्यक्त होतात. त्याच भारत देशात आज राजरोजपणे स्त्री भ्रूण हत्या होताना दिसत आहेत. असे का होत आहे हे शोधणे महत्त्वाचे आहे.
गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या या आज काल सुरू झाल्या असे म्हणणे धाडसाचे होईल. हे पूर्वीपासून होत आहे. परंतु याचे प्रमाण आता खूपच वाढले आहे. काय आता आईला मुलगी नको असते की जन्मदात्याला मुलीचा बाप होणे आवडत नाही अशी कोणती मजबूरी असते की स्त्रीसुद्धा हे पाप करायला तयार होते. या सर्व गोष्टींचा विचार करता एक लक्षात येते की ही एक अगतिकतेतून निर्माण झालेली मानसिकता आहे. या अगतिकतेची अनेक कारणे आहेत तसेच ग्रामीण शहरी तसेच उच्चभ्रू असे वेगवेगळे स्थरही आहेत. शहरी आणि उच्चभ्रू वर्गाची स्त्रााrभ्रूण हत्येमागची कारणे वेगळी आहेत. त्याचा वेगळा विषय होऊ शकतो.

2 comments: