Tuesday, 14 March 2017

आजची स्त्री


आजची स्त्री

सातच्या आत घरात नाही
पण सातच्या आत
घरचा उबरठा ओलांडणारी
डोळ्यात आशावादी स्वप्न
हातात कर्तुत्वाची ढाल
हृदयात वात्सल्याचा सागर
चेहऱ्यावर रणराणीची झळळी
डोक्यात संगणकाचे ज्ञान
सुगरणीच्या खोप्याप्रमाणे
पिलांसाठी जीव घरी टांगलेला
परंपरांचा जुनाट कोशा फेकून
करारीपणची वस्त्रे लेवूनी
स्वरक्षणया  देशरक्षणाया निघाली
क्षितिज हिच जिला मर्यादा
तिच आजची स्त्री …………..!

1 comment: